कृष्ण जन्माष्टमीला चुकूनही करू नका ‘ही’ कामे, मिळत नाही पूजेचं ‘फळ’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आज देशभरात कृष्णा जन्माष्टमी साजरी केली जात आहे. हा उत्सव ११ आणि १२ ऑगस्ट दोन्ही दिवस आहे. या दिवशी भाविक उपवास करतात आणि दिवसभर श्रीकृष्णाचे भजन-कीर्तन करतात. या दिवशी कृष्णाच्या बाल स्वरुपाची पूजा केली जाते. या दिवशी देशातील प्रत्येक मंदिराची खास सजावट केली जाते. घरी भगवान श्री कृष्णाची पूजा करून त्यांना झोपाळ्यात बसवले जाते.

कृष्ण जन्माष्टमीचा दिवस खूप शुभ असतो आणि असे मानले जाते की, या दिवशी भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र या दिवशी काही विशेष गोष्टींचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कृष्णपूजनाच्या वेळी कोणती कामे शुभ मानली जात नाहीत ते जाणून घ्या…

जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. भगवान विष्णू हे श्रीकृष्णाचा अवतार मानले जातात. श्रद्धानुसार, तुळस भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडणे शुभ मानले जात नाही.

जे जन्माष्टमीचा उपवास ठेवत नाहीत, त्यांनीही या दिवशी भात खाऊ नये. एकादशी आणि जन्माष्टमीच्या दिवशी तांदूळ आणि गव्हापासून बनलेले अन्न खाणे निषिद्ध मानले जाते.

लसूण, कांदा किंवा इतर कोणतेही तामसिक भोजन आजच्या दिवशी करू नये. या दिवशी घरात मांस आणि अल्कोहोल आणू नये.

कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही कोणाचा अनादर करू नका. श्रीकृष्णासाठी श्रीमंत किंवा गरीब सर्व भक्त समान आहेत. कोणत्याही गरीबाचा अपमान केल्याने श्रीकृष्ण दु:खी होऊ शकतात.

जन्माष्टमीच्या दिवशी झाडे तोडणे देखील अशुभ मानले जाते. श्री कृष्ण प्रत्येक गोष्टीत आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्यात आहे. शक्य असल्यास या दिवशी अधिक झाडे लावावीत. यामुळे घरात आणि कुटुंबात आनंद आणि शांती येते.

जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळणे बंधनकारक आहे. या दिवशी भगवंताची उपासना पूर्ण धार्मिक व मनाने करावी.

या दिवशी चुकूनही गायींचा अपमान करू नये. भगवान श्रीकृष्णाचे गायींवर खूप प्रेम होते. कृष्ण लहानपणी गायींसोबतच खेळत असे. असे मानले जाते की, जो गाईची पूजा करतो त्याला श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळतो.

जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांनी रात्री बारा वाजेच्या आधी आपला उपवास सोडू नये. त्यापूर्वी उपवास सोडल्याने उपासनेचे फळ मिळत नाही आणि उपवास देखील अपूर्ण मानला जातो.