‘कृष्ण’ नितीश भारद्वाज यांचा इंस्टाग्राम ‘डेब्यू’, व्हिडीओ शेअर करत सांगितला एक ‘चमत्कार’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :लॉकडाऊनमध्ये अनेक मालिका रिपीट टेलीकास्ट केल्या जात आहेत. यापैकीच एक आहे महाभारत. बी आर चोपडा यांच्या महाभारत या मालिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे नितशी भारद्वाज यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर डेब्यू केला आहे. नितीश यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यासोबत घडलेल्या एका चमत्काराबद्दल सांगितलं आहे.

व्हिडीओ शेअर करत नितीश भारद्वाज म्हणतात, ते कोणतेही देव नाहीत. अनेक लोक त्यांना म्हणतात, ते खरंच श्रीकृष्ण आहेत. यावर नितीश यांनी दोन्ही कान पकडत सांगितलं की ते कोणतेही देव नाहीत. खऱं पाहिलं तर देव प्रत्येकाच्या आत आहे. गरज आहे ती फक्त ओळखण्याची असं ते म्हणाले.

नितीश यांचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला आहे. अद्याप अनेक चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अजूनही हा व्हिडीओ चाहत्यांकडून पाहिला जाताना दिसत आहे. नितीश यांनी आता ट्विटर आणि युट्युब जॉईन करणार असल्याचंही सांगितलं आहे.

अनेकांना हे माहिती नसेल की, नितीश महाभारत या मालिकेतील विदुराच्या रोलच्या ऑडिशनसाठी आले होते परंतु 24 वय असल्यानं रवी चोपडा यांनी त्यांना कृष्णाचा रोल दिला. अशा प्रकारे त्यांचं आयुषच बदलून गेलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like