महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विद्यमान कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे ( वय 75 )यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मूळचे कोपरगाव येथील असलेले कुदळे हे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते. दि सासवड माळीनगर शुगर फॅक्टरी चेतश अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे ते उपाध्यक्ष होते. कृष्णकांत कुदळे सहकारी नागरी पतसंस्था, कुदळे फाउंडेशन, पथिक परिवार, पुणे फेस्टिव्हलच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. फेस्टिव्हल च्या मुख्य संयोजकाची जबाबदारीही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विद्यमान कार्याध्यक्ष म्हणून काम करीत होते. काही दिवसांपासून घोले रोड येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी तीन वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली