Krishnakumar Kunnath – Singer KK | प्रसिद्ध गायक केके यांचे 53 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Krishnakumar Kunnath – Singer KK | बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath – Singer KK) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Died) झाले आहे. ते 53 वर्षाचे होते. कोलकाता येथे कॉन्सर्ट झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. अचानकपणे ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी त्यांच्या मृत्यू हृदय विकाराने झाल्याचे दिसत आहे. पण शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.

 

बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांपैकी एक असणाऱ्या केके (Krishnakumar Kunnath – Singer KK) यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांची 200 हुन अधिक सुपरहिट गाणी असून 1990 च्या दशकात त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसोबतच पार्टी सॉंग्स देखील गायले आहेत. ‘खुदा जाने’ हे रोमॅन्टिक गाणे, ‘इट्स द टाइम टू डिस्को, कोई कहे कहता रहे, तडप तडप के इस दिल से’, ही त्यांची गाणी अगदी हृदयाला स्पर्श करतात. याशिवाय, शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट ओम शांति ओमचे गाणे ‘आंखों में तेरी अजब सी’, बजरंगी भाईजानचे ‘तू जो मिला’, इकबाल फिल्मचे ‘आशाएं’ आणि अजब प्रेम की गजब कहानी चित्रपटातील गाणे ‘मैं तेरा धडकन तेरी’ ही त्यांच्या चाहत्यांतील सर्वाधिक लोकप्रिय गाणी होती.

मोदींनीही केले दु:ख व्यक्त –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केके यांच्या अकाली निधनाबद्दल ट्विटरवरून दुःख व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, “केके नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले.
सर्व वयोगटातील लोकांसाठीच्या भावनांचे प्रतिबिंब त्यांच्या गाण्यांमध्ये दिसते.
ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमाने नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबाप्रति आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती,’ असेही ते म्हणाले.

 

Web Title :- krishnakumar kunnath singer kk bollywood singer kk passes away at the age of 53

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा