न भूतो न भविष्यती ! ‘या’ खेळाडूची ‘कमाल’ अन् ‘धमाल’, 4 ओव्हर मध्ये 8 विकेट तर 39 बॉलमध्ये काढले 134 रन

बेंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमिअर लीग मध्ये आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत सर्वांना चकित करून सोडले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या ४ ओव्हर मध्ये ८ गाडी बाद करत केवळ ३९ चेंडूत १३४ रन काढण्याचा विक्रमही केला. KPL मध्ये रन काढण्याचा आणि विकेट घेण्याचा अक्षरशः  धुमधडाकाच उडवून दिला. बेल्लारी टस्कर्सकडून शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळताना कृष्णप्पा गौतमने ही अविश्वसनीय अशी कामगिरी केली आहे.

KPL सामन्यांना टी-२० म्हणून दर्जा नाही 

कृष्णप्पा गौतम या अष्टपैलू खेळाडूची ही कामगिरी टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, केपीएल सामन्यांना टी-२० म्हणून दर्जा नाही. कर्नाटक प्रीमिअर लीग संघाकडून हे आतापर्यंतचं सर्वाधिक वेगवान शतक आहे.

जादुई फिरकी

कृष्णप्पाने एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अवघ्या ३९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे. त्यात १३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कृष्णप्पाने सर्वांना चकित करून सोडणारी कामगिरी केली आहे. आपल्या जादुई फिरकीने शिवमोगा लायन्सच्या फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला.

आरोग्यविषयक वृत्त –