उर्मिलानं केलेली ‘ही’ भूमिका कृतिचा ‘ड्रीम’ रोल, ‘या’ सारख्या सिनेम्यात ‘इंटरेस्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कृति खरंबादाने २०१६ मध्ये चित्रपट ‘राज रीबूट’सोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ती अनेक काळापासून साउथ इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. यानंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले. जसे की, ‘गेस्ट इन लंदन’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘यमला पगला दीवाना’ आदी चित्रपटात तिने काम केले आहे. २८ वर्षाची अभिनेत्री कृति खरंबादा आता अनेक मोठ्या बजेट चित्रपटात काम करणार आहे. तिने आपल्या भूमिकेबद्दल चर्चा केली.

सध्या अभिनेत्री कृति इंडस्ट्रीमध्ये चॅलेजिंग भूमिकेच्या शोधात आहे. तिने सांगितले की, मला वाटते की, मला एक सायकोलॉजीकल थ्रिलर मध्ये करायला आवडेल. मला उर्मिला मातोडकरचा चित्रपट ‘एक हसीना थी’ खूप आवडला होता. तिची भूमिका आणि परफॉमन्स पाहून मला खूप आश्चर्य वाटले होते. मला एका अशा चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे जे ऑफबीट पण असेल आणि मेनस्ट्रीम चित्रपट असेल. या व्यतिरिक्त मला एक अॅक्शन सीन करण्याची आवड आहे.

यावर्षी कृती चित्रपटात दिसणार आहे. कृती अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. ती अनीज बजमीचा कॉमेडी चित्रपट ‘पागलपंती’ चा हिस्सा बनणार आहे. या चित्रपटात ती अनिल कपूर, जॉन अब्राहम आणि इलियाना डिक्रूज सारख्या कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे. यानंतर ती ‘हाउसफुल ४’ मध्ये अक्षय कुमार, पूजा हेगडे, रितेश देशमुख, बॉबी देओल आणि कृति सेनन आदी कलाकारांसोबत दिसून येणार आहे. कृतिचा ‘पागलपंती’ ८ नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ‘हाउसफुल ४’ दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय