कृती सेनन सारखं सुंदर दिसायचंय ? ‘हे’ तिचे 5 ब्युटी सिक्रेट ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कृती सेनन (Kriti Sanon) अ‍ॅक्टींगमुळं कायचम चर्चेत असते. अभिनयासोबत कृती हाईट आणि ब्युटीसाठीही फेमस आहे. तिची स्कीन खूप प्लॉसेस आहे. सर्वच यासाठी तिचं कौतुक करतात. कृती नैसर्गिक गोष्टींचा जास्त करत असते. अनेकांना तिचं ब्युटी सिक्रेट जाणून घ्यावसं वाटतं. फेमिना मध्ये छापलेल्या रिपोर्टच्या हवाल्यानं कृतीचे 5 ब्युटी सिक्रेट समोर आले आहेत. तुम्हीही तिचे हे सिक्रेट फॉलो करून तिच्याप्रमाणे सुंदर दिसू शकता. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) सनस्क्रीन लोशन – कृतीच्या बॅगमध्ये कायमच एक चांगलं सनस्क्रीन लोशन असतं. घरातून बाहेर निघताना याची गरज पडते असं तिचं म्हणणं आहे. टॅनिंगपासून वाचण्यासाठी याची मदत होते. फक्त उन्हातच नव्हे, बाहेर वातावरण कसंही असो याचा वापर केला पाहिजे असं तिचं म्हणणं आहे.

2) रात्री झोपण्यापूर्वी रिमुव्ह करा मेकअप – कृतीचं म्हणणं आहे रात्री झोपण्यापूर्वी मेकअप नक्कीच रिमुव्ह केला पाहिजे. हे करणं स्किनसाठी खूप गरजेचं असतं. अनेकजण आळसापोटी मेकअप काढत नाहीत. यामुळं इंफेक्शन होऊ शकतं. त्वचेवर डाग दिसू शकतात. माईल्ड क्लींजर च्या मदतीनं चेहऱ्यावरील मेकअप काढा. यानंतर फेस वॉशच्या मदतीनं चेहरा चांगला धुवून घ्या.

3) मॉईश्चराईजर विसरू नका – चेहरा फेसवॉशनं धुतल्यानंतर मॉईश्चराईज करणं खूप गरजेचं आहे. एक चांगल्या कंपनीचा मॉईश्चरायजर नक्की वापरा. यामुळं सकाळी उठल्यानंतर चेहरा फ्रेश आणि मऊ वाटेल. यानं स्कीन ग्लोईंग आणि नरिश राहते.

4) स्कीन केअर रूटीन फॉलो करा – कृतीचं माननं आहे की, स्कीन चांगली राहण्यासाटी स्कीन केअर रूटीन गरजेचं आहे. यासाठी ब्युटी टीप्स नाही तर हेल्दी जेवण आणि खूप सारं पाणी प्या. स्कीन ग्लोईंग आणि डिटॉक्सिफाय करण्यासाठी फळं खाणंही गरजेचं आहे.

5) नॅचरल फेसपॅकचा वापर – कृती तिच्या चेहऱ्यासाठी नॅचरल फेसपॅक वापरते. चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा जेल, बेसन, हळद, लिंबू, मध अशा गोष्टींचा वापर करते. चेहरा ग्लोईंग आणि फ्रेश दिसण्यासाठी या वस्तूंचा खूप फायदा होतो असं तिचं म्हणणं आहे.

कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती मिमी या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उटेकर यानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. अशी माहिती होती की, 20 डिसेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.