Kriti Sanon | क्रिती सेननचा सिजलिंग लूक पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) तिच्या अभिनयाबरोबरच लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. क्रिती गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. क्रिती अभिनेता प्रभासला डेट करत असल्यावरून अनेक चर्चा पसरल्या होत्या. त्यानंतर ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अनेक गोष्टी घडल्याने क्रिती चर्चेत आली होती. क्रितीने आता तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक प्रोजेक्ट साइन केले आहे. यामुळे ती नवनवीन चित्रपटात झळकणार आहे. क्रिती (Kriti Sanon) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा क्रितीने नवीन फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

याआधी क्रितीने लाल रंगाच्या शॉर्टमधील तिचे हॉट फोटोज शेअर केले होते.
या फोटोवर लाखोंनी लाईक आलेले पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा क्रितीने तिच्या हॉटनेसची जादू चाहत्यांवर पाडली आहे. या फोटोमध्ये क्रिती ब्रालेट स्टाइल ब्लैक आणि रेड स्ट्राइप्ड थाई हाई स्लिट आउटफिट मध्ये दिसत आहे. यावेळी तिने गोल्डन कलरचे हेवी इयरिंग्स आणि अर्धे केस बांधलेले दिसत आहे. या कपड्यांवर क्रितीने हिल्स परिधान केलेले आहे. तिचा हा कम्प्लीट लूक तिला खूपच हॉट बनवताना दिसत आहे. क्रितीच्या या हॉटनेसने सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.

नेहमी प्रमाणे क्रितीच्या (Kriti Sanon) या फोटोंवर देखील कमेंट आणि लाईकचा वर्षाव जोरात होताना दिसत आहे.
या लुक मध्ये क्रितीने एकापेक्षा एक पोजेस कॅमेरासमोर देत चाहत्यांना चकित केले आहे.
क्रितीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिती नेहमीच तिच्या सिझलिंग आणि स्टायलिश लुक
मुळे लोकांना वेड लावत असते. क्रिती आता लवकरच पुन्हा एकदा कार्तिक आर्यन सोबत रोमान्स करताना
‘शहजादा’ चित्रपटात दिसणार आहे. तर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title :- Kriti Sanon | bollywood kriti sanon shared classy look in red dress see her photos here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात