Video : टायगर श्रॉफसोबत गणपतीमध्ये जोरदार अ‍ॅक्शन करताना दिसणार Kriti Sanon, तयारी सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही ‘गणपत’ या चित्रपटात काम करत आहेत. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट पूर्ण अ‍ॅक्शनने भरलेला असून यात केवळ टायगरच नाही तर कृती सॅनॉनही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. त्यामुळे कृतीचा हा पहिला प्युअर अ‍ॅक्शन एंटरटेन्टर चित्रपट असेल. यासाठी तिने तयारीही केली आहे.

टायगरसोबत पुन्हा एकदा काम करण्याबाबत आणि अ‍ॅक्शन सीनबद्दल कृती म्हणाली, “माझ्या पहिल्या को- स्टारसोबत पुन्हा काम करण्यास खूप वेळ लागला. आम्ही जुलैमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहोत. मी या चित्रपटात टायगरच्या विरुद्ध अ‍ॅक्शन करण्यासाठी नर्वस आहे कारण तो त्यामध्ये खूपच चांगला आहे. अशा चित्रपटात एकत्र काम करताना परिपूर्ण होणे महत्वाचे आहे अन्यथा आपल्यातील उणीवा कमी दिसू लागतात. मला वाटते की तो माझा स्टंट सुधारण्यास मदत करेल.”

दरम्यान कृतीच्या वॉर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास काही काळापूर्वी तिने प्रभाससमवेत आपल्या आदिपुरुष चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. यात ती सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय वरुण धवनसोबत वुल्फ चित्रपटातही ती काम करत आहे. कृतीजवळ बच्चन पांडे, मिमी आणि हम दो हमारे दोसारखे चित्रपट आहेत.