‘या’ अभिनेत्यानं उडवली अक्षय कुमारची खिल्ली, म्हणाला – ‘त्याच्याकडे पैसे कमवायला केवळ दोन-तीन वर्षेच शिल्लक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   स्वयंघोषित फिल्म क्रिटीक आणि अ‍ॅक्टर कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरके (KRK) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव असतो. आपल्या वादग्रस्त विधानामुळं तो कायमच चर्चेत येताना दिसतो. तो अनेकदा सेलिब्रिटींवरही टीका करत असतो. केआरकेनं आता बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यावर निशाणा साधला आहे. अक्षय कुमार कडे पैसा कमवायाला आता दोन-तीन वर्षेच शिल्लक राहिले आहेत हे त्याला माहिती आहे अशी टीका करत केआरकेनं त्याची खिल्ली उडवली आहे. यासंदर्भात त्यानं ट्विट केलं आहे.

नेमकं काय म्हणाला केआरेक ?

आपल्या ट्विटमध्ये केआरके म्हणतो, अक्षय कुमारचे सिनेमे कोणीच खरेदी करत नाहीये. सूर्यवंशी आणि बेल बॉटम असे सिनेमे प्रदर्शित होत नाहीयेत. परंतु तरीही तो एकामागोमाग एक सिनेमांची घोषणा करत आहे. अक्षय दिवसातील 24 तास काम करत आहे. कारण त्याला माहित आहे की, त्याच्याकडे पैसे कमवायला केवळ दोन-तीन वर्षेच शिल्लक आहेत. वेडे निर्माते देखील त्याला सिनेमांचे 125 कोटी रुपये देत आहेत अशी टीका केआरके नं केली आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1373068023263809540?s=20

केआरकेनं शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअरही केलं आहे. काहींनी त्याला सपोर्ट केलाय. तर काहींनी त्याला सुनावलं देखील आहे. अक्षयच्या प्रगतीवर तो जळत आहे असंही काही चाहते म्हणाले आहेत.

सेलेब्सवर टीका करण्याची केआरकेची ही पहिलीच वेळ नाही. त्यानं आधीही अनेकांवर निशाणा साधला आहे. केआरकेनं अद्याप बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि यशराज फिल्म्सचे चेअरमन (Chairman of Yash Raj Films) आदित्य चोपडा (Aditya Chopra) यांच्यावरही निशाणा साधत टीका केली आहे.