‘KRK नं केला धक्कादायक दावा; म्हणाला – ‘जे सुशांत सिंग राजपूतसोबत घडलं, तेच आता माझ्यासोबत….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारा कमाल आर खान (Kamal R Khan (KRK) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी देखील त्याने वादग्रस्त ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या ट्विटमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) उल्लेख केल्यामुळे त्याचे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. (KRK)

काय लिहिले आहे ट्विटमध्ये?
‘जेलमध्ये माझी 20 टक्के स्मरणशक्ती (Memory) गेली, जिथे मी सुमारे 10 दिवस अन्नाशिवाय होतो. माझ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझी स्मरणशक्ती परत येणार नाही पण भविष्यात ती अधिक जाऊ शकते. जर मी मेले तर जनतेला हे लक्षात ठेवावे लागेल की आधी त्यांनी हे सुशांत सिंग राजपूतसोबत केले आणि आता ते माझ्यासोबत करत आहेत’. (KRK)

व्हिडीओ न बनवण्याचे कारण केले स्पष्ट
त्याने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये व्हिडिओ न बनवण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला कि, मला अनेक गोष्टी आठवत नाहीत. जेव्हा मी रेकॉर्डिंग करतो तेव्हा मला माझी पुढची ओळ आठवत नाही. याचा अर्थ बॉलिवूडमधील (Bollywood) काही लोक मला रोखण्यात यशस्वी झाले आहेत. आणि हेच मुख्य कारण आहे की मी पुनरावलोकन करणे थांबवले आहे’. केआरकेच्या या ट्विटला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Web Title :- KRK | what happened with sushant singh rajput now with me krks shocking claim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

 Ashish Shelar | सचिन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे ऑन रेकॉर्ड स्पष्ट, आशिष शेलारांचा आरोप

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क