Krushi Utpanna Bazar Samiti Pune | कृषी उत्पन्न बाजार समितीचा 65 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Krushi Utpanna Bazar Samiti Pune | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा 65 वा वर्धापनदिन (Anniversary) आजी-माजी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. पुणे कृषी उत्पन्न समितीची (Krushi Utpanna Bazar Samiti Pune) स्थापना 1 मे 1957 रोजी झाली. या स्थापनेस 65 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 1 मे रोजी बाजार समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार स्वेच्छा वर्गणी मधून 65 वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी बाजार समितीचे संस्थापक संचालक यांचे कुटुंबीय, आजी-माजी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उपस्थितीत निसर्ग कार्यालय, गुलटेकडी पुणे येथे पहिल्यांदाच साजरा केला.

 

या कार्यक्रमाला डॉ. राजाराम धोंडकर (Dr. Rajaram Dhondkar), उपनिबंधक सहकारी संस्था, प्रशासक मधुकांत गरड (Deputy Registrar of Co-operative Societies, Administrator Madhukant Garad), योगेश थोरात व्यवस्थापकीय संचालक महा एफ पी सी, दि पुना मर्चंटस चेंबरचे पदाधिकारी माजी अध्यक्ष वालचंद संचेती, अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबोले तसेच आडते असोसिएशनचे पदाधिकारी माजी अध्यक्ष विलासशेठ भुजबळ, अध्यक्ष बापू भोसले, सचिव करण जाधव, अध्यक्ष फुल मार्केट आडते असोसिएशन आप्पासाहेब गायकवाड, कामगार संघटना अध्यक्ष संतोष नांगरे हे उपस्थित होते.

बाजार समितीचे (Krushi Utpanna Bazar Samiti Pune) प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजार समिती स्थापनेबाबतचे शासनाचे 1 मे 1957 चे नोटिफिकेशन वाचून दाखविले आणि तेंव्हा पासून पुण्यात बाजार समितीचे मंडई (Mandai), नाना पेठ (Nana Peth), भवानी पेठ (Bhawani Peth) ते गुलटेकडी मार्केट यार्ड (Gultekdi Market Yard) कशाप्रकारे स्थित्यंतरे यावर भाष्य केले. थोरात यांनी बाजार समित्यांची सद्यस्थिती, भविष्यातील आव्हाने आणि त्यावरील उपाय योजनांसाठी तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश सुपेकर यांनी केले व आभार प्रदर्शन रमेश उंद्रे यांनी केले.

 

Web Title :-  Krushi Utpanna Bazar Samiti Pune
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar on Raj Thackeray | ‘कुणी अल्टिमेटम देऊन जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा !

 

MP Navneet Rana and MLA Ravi Rana | राणा दाम्पत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ, कोठडीतील मुक्काम वाढला

 

Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | ‘शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा’; इम्तियाज जलील यांचा पवारांवर निशाणा !