भाजप मंत्री राजवर्धन सिंह यांच्या विरोधात ‘ही’ महिला खेळाडू निवडणुक लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचे वारे जसे बॉलीवूडमध्ये वाहत आहे. तसंच ते खेळाडूंच्या जगतातही वाहू लागले आहे. कारण सोमवारी काँग्रेसने राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात येथील एकूण ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात जयपूर येथे काँग्रेसने जो उमेदवार दिला आहे, त्याने जयपूर ग्रामीणमध्ये वेगळी चुरस पाहायला मिळणार आहे. कारण हा निवडणूकीचा सामना दोन खेळाडूंमध्ये रंगणार आहे.

जयपूर ग्रामीणमध्ये भाजचे केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसने त्यांच्या विरोधात थाळीफेक खेळाडू कृष्णा पुनिया यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे दोन खेळाडूंमधील ही लढत चुरशीची होणार आहे.

राजवर्धनसिंह राठोड आपल्या शुटींग प्रकारात अव्वल खेळाडू आहेत. गेल्या पाचवर्षात त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री पदाचे कामकाज पूर्ण निष्ठेने पार पाडले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणाला द्यावे हा काँग्रेससमोर प्रश्न असावाच. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी त्यांचा मास्टरस्ट्रोक खेळत कृष्णा पुनिया या ऑलिम्पिक खेळाडूला प्राधान्य देत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजवर्धन यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

पुनिया यांनी २००४, २००८, आणि २०१२ या ३ वर्षात ऑलिम्पिकमध्ये ३ वेळा थाळीफेक या खेळात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले. तर, २००४च्या एथेंस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे.

दरम्यान, काँग्रेसने रात्री जाहीर केलेल्या यादीत गुजरातमधील एक, महाराष्ट्रतील दोन आणि राजस्थानमधील सहा उमेदवरांची नावे जाहीर करण्यात आली.