सिन्नर येथील KSB कंपनीनं 3 लाखाचं आरोग्य साहित्या दिलं कोविड सेंटरला भेट

लासलगाव :  वार्ताहर –   निफाड तालुक्यात कोरोना बधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने जास्तीतजास्त रुग्णांना उपचार मिळावा यासाठी लासलगाव कोविड केअर सेंटरमधील आरोग्य टीमला कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदतीची वाट पाहण्याची वेळ येऊ नये या करीत सिन्नर येथील केएसबी कंपनीने सीएसआर फंड मधून लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला 20 बेड ,गाद्या आणि सलाईन स्टँड असे एकूण तीन लाख रुपयांच्या आरोग्य उपयुक्त वस्तूंची भेट केएसबी कंपनी अधिकारी चंद्रकांत वरुन्से यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सतीष सुर्यवंशी यांच्याकडे दिली यावेळी कोविड केअर सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राजाराम शेंद्र ,वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण अहिरे उपस्थित होते

कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ असल्याने कोरोना बाधित रुग्ण संख्येत दररोज वाढ होत असल्याने नाशिकनंतर निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे कोरोना बधितांची संख्या आतापर्यंत एकूण 480 वर पोहचली आहे यातील 323 रुग्णांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे 20 जनांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून उर्वरित 137 कोरोना बधितांवर उपचार सुरू आहे लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये 30 रुग्णांवर उपचाराची सुविधा असल्याने उर्वरित रुग्णांवर पिंपळगाव येथील सीसी सेंटर तसेच नाशिक येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने लासलगाव येथे जास्तीतजास्त रुग्णांना उपचार मिळावा रुग्णांची फरफटत होऊ नये यासाठी कोविड सेंटरमधील औषध निर्माण अधिकारी विजय पाटील यांनी केएसबी कंपनीच्या सीएसआर फंडमधून 20 बेडची मागणी केली होती त्याला प्रतिसाद देत केएसबी कंपनीने स्टीलचे 20 बेड ,20 गाद्या तसेच 20 सलाईन स्टँड असे एकूण तीन लाख रुपयांच्या आरोग्य उपयुक्त वस्तूंची भेट दिल्याने या कंपनीचे कौतुक करत लासलगाव कोविड केअर सेंटरमध्ये आता 50 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सतीष सुर्यवंशी यांनी संगितले