ड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी निर्माता क्षितिज प्रसाद याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात चौकशी आणि अटकेच्या फेऱ्या सातत्याने सुरू आहेत. शनिवारी मुंबईच्या एनसीबी टीमने बॉलिवूडशी संबंधित असलेल्या क्षितीज प्रसाद याला अटक केली. क्षितिज धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर होता. एनसीबीने काही दिवसांपूर्वी त्याची सतत चौकशी केली होती आणि क्षितिजला नुकतीच अटक करण्यात आली आहे. एक दिवस अगोदर क्षितीज प्रसादला एनसीबीने बोलवून चौकशी केली होती. असा आरोप केला जात आहे की क्षितिज ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत होता.

ड्रग पेडलर्ससह फोटो आले समोर
मिळालेल्या माहितीनुसार काही फोटो उघडकीस आले असून त्यामध्ये धर्मा प्रोडक्शनचा माझी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद एका ड्रग पेडलरसोबत उभा असल्याचे दिसले. ड्रग कनेक्शनमध्ये हे चित्र क्षितीज प्रसादविरूद्ध सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. अंकुश अरेंजा असे या ड्रग पेडलरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने चौकशी केली व पुरावे मिळाल्यानंतरच क्षितीजला अटक केली आहे. त्याला नुकतेच एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते.

क्षितिजच्या घरी यायचे ड्रग पेडलर्स
असे सांगितले जात आहे की क्षितीजच्या घरी होणाऱ्या प्रत्येक फंक्शन किंवा पार्टीमध्ये ड्रग पेडलर अंकुश यायचा. मग ती मुंबई असो वा दिल्ली. विशेष म्हणजे क्षितीज प्रसाद करण जोहरच्या अगदी जवळचा मानला जातो.

करण जोहरने दिला नकार
दरम्यान, करण जोहरने क्षितिजशी निकट संबंध नसल्याचे सांगितले. तसंच करणने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे की आपण 2019 मध्ये पार्टीबद्दल आधीच चर्चा केली आहे. त्याने सांगितलं की कोणतीही ड्रग्ज घेतली नाही किंवा ड्रग पार्टीही केली नाही. काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ड्रग्स पार्टी देखील एनसीबी रडारवर आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like