Kshitish Date | ‘धर्मवीर’ चित्रपटात CM एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा अभिनेता छोट्या पडद्यावर झळकणार; ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भूमिका साकारलेला अभिनेता क्षितीश दातेने (Kshitish Date) चाहत्यांची मने जिंकली होती. क्षितीश ने अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी साकारलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भूमिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली होती. आता क्षितीश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Kshitish Date)

 

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘लोकमान्य’ (Lokmanya) या मालिकेतून क्षितीश (Kshitish Date) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची भूमिका क्षितीश (Kshitish Date) साकारणार आहे. टिळकांचा प्रभावी इतिहास या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एवढेच नाही तर या मालिकेत लोकमान्य टिळकांच्या कौटुंबिक आयुष्यातील काही महत्त्वाचे घटक या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तर टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत.

याआधी क्षितीशजने अनेक नाटक आणि मालिका व चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.
सध्या लोकमान्य या मालिकेत क्षितीश सह अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्स ने केली असून स्वप्नील वारके (Swapnil Warke) यांनी दिग्दर्शन केले आहे.
ही मालिका 21 डिसेंबर पासून बुधवार – शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title :- Kshitish Date | zee marathi new serial kshitish date who play cm eknath shinde in dharmveer and spruha joshi to play lead role in lokmanya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना