२० कोटी घेणार्‍या पाकिस्तानच्या वकिलाला भारताच्या साळवेंनी हरवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने खटला चालवण्यासाठी मात्र १ रुपया खर्च केला तर पाकिस्तानने यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. भारताच्या वतीने हि केस लढणाऱ्या हरीश साळवे यांनी फक्त १ रुपया मानधनाच्या स्वरूपात घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताला पराभूत करण्यासाठी लढणाऱ्या वकिलावर पाकिस्तानने २० कोटी रुपये खर्च केले आहेत.

काल जाहीर झालेल्या निकालात आंतररष्ट्रीय न्यायालायने भारताच्या बाजूने निर्णय देताना कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगितीबरोबरच त्यांना कौन्सिलर देखील उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचे साळवे यांनी सांगत जाधव यांच्या फाशीवर स्थागिती आणली. सर्व युक्तिवाद ऐकून अखेर न्यायालयाने १५-१ असा भारताच्या बाजूने निकाल दिला.

हरीश साळवे यांची कारकीर्द

हरीश साळवे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक असून ते एका दिवसाची फी म्हणून ३० लाख रुपये घेतात अशी माहिती मिळाली आहे. मात्र या खटल्यात भारताच्या वतीने लढण्यासाठी त्यांनी केवळ एक रुपया फी म्हणून घेतली आहे. १९९९ पासून २००२ पर्यंत ते सॉलिसिटर जनरल होते.

तर पाकिस्तानच्या वतीने लढणाऱ्या खावर कुरैशी यांचे मानधन देण्यासाठी पाकिस्तान सरकारने मागील वर्षी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे एका बाजूला भारताला पराभूत करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च करणाऱ्या पाकिस्तानला या प्रकरणात पराभूत करता आले नाही.

केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा

आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम

‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या

आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्‍नांची उत्‍तरे आवश्य जाणून घ्या !

सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा

‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ