पाकिस्तानची पुन्हा ‘कुरापत’, लाहोरमध्ये असलेल्या कुलभूषण जाधव यांना ‘अज्ञात’स्थळी हलवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने पुन्हा आपले रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात न्यायालायने भारताच्या बाजूने निर्णय देताना कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर उपलब्ध करून देण्यात यावा. त्यानंतर आता पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना १९ जुलै रोजी अज्ञात स्थळी हलविले आहे. सूत्रांनी दिलेली माहितीनुसार जाधव यांना लाहोरमध्ये ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले आहे.

काउन्सिलर देण्याआधी पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना आम्ही सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी ठेवले असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. अजूनपर्यंत कुलभूषण यांना काऊन्सिलर देण्यात आलेला नाही. दोन्ही देशांमध्ये याविषयी चर्चा सुरु असून भारत विना अट काउन्सिलर देण्याची मागणी करत आहे तर पाकिस्तान त्यांच्या कायद्याच्या अधीन आणि अटी आणि शर्तींवर काउन्सिलर देण्याबाबत सहमती दर्शवत आहे.

भारतीय विदेश मंत्रालयाने तात्काळ काउन्सिलर ऍक्सेस देण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय आमच्या बाजूने असल्यामुळे जाधव यांना लवकरात लवकर काउन्सिलर ऍक्सिस मिळावा, अशी मागणी भारताने केली आहे. मात्र पाकिस्तानच्या वतीने यामध्ये उशीर होत असून दोन्ही देशांमध्ये अद्यापपर्यंत चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मार्च २०१६ मध्ये त्यांना पाकिस्तानने इराणमधून बंदी बनवले होते. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्यांच्या पत्नी आणि आईने ज्यावेळी त्यांची भेट घेतली होती त्यावेळी देखील त्यांच्या जखमा लपविण्याचा प्रयत्न केला गेला होता.

आरोग्यविषयक वृत्त –