ICC World Cup 2019 : कुलदीप यादवच्या ‘करामती’ बॉलवर ICC ‘फिदा’, बाबर ‘बोल्ड’ झाला तो ‘सर्वोत्‍तम’ बॉल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाचा चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या फिरकीने पाकिस्तानी फलंदाजाना नाचवले. कुलदीपने पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम याचा त्रिफळा उडवला आणि भारताचा विजय सोपा केला. भारतीय संघाने हा सामना डकवर्थ ल्युईसच्या नियमानुसार ८९ धावांनी खिशात घातला.

या स्पर्धेत कुलदीप भलताच फॉर्ममध्ये असून विरोधी संघाच्या फलंदाजाला घाम फोडण्याचे काम तो सध्या करत आहे. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत ३२ धावा देत पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. त्याच्या या गोलंदाजीचा एक व्हिडीओ ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे. भारताच्या ३३६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज बाबर आझम आणि फखर जमान मध्ये मोठी भागिदारी झाली. त्यामुळे सामन्याचे पारडे त्यांचा बाजूने झुकू लागले. परंतु कुलदीपने एका शानदार चेंडूवर बाबरला चकवले आणि त्याचा त्रिफळा उडवला.त्याचाच एक व्हिडीओ ट्विट करत आयसीसीने वर्ल्डकपमधील सर्वोत्कृष्ट चेंडू म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून गुरुवारी भारत आपला पाचवा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. कुलदीप यादव याने देखील तो सर्वोत्तम चेंडू होता असे म्हटले आहे. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली याने देखील कुलदीपच्या या चेंडूचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ओल्ड ट्रफॉर्डच्या मैदानावर २६ वर्षापूर्वी १९९३ ला अशेंस मालिकेत इंग्लंडच्या माइक गेटिंग याची विकेट घेतली होती. तो चेंडू आजदेखील क्रिकेट रसिकांच्या मनात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

 

सिने जगत –

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

Loading...
You might also like