कुमार मंगलम बिर्लांचे 2 वर्षात बुडाले 21 हजार कोटी, जाणून घ्या कसे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील टेलिकॉम सेक्टरमधील संकटाचा परिणाम आता प्रमोटर्सवरही दिसत आहे. वोडाफोन ग्रुप पी.एल.सी.मध्ये उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला दुसरे मोठे गुंतवणूकदार आहेत. परंतु टेलिकॉम सेक्टरमधील संकटामुळे त्यांची एकूण संपत्ती सुमारे 3 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. 2017 नंतर त्यांची संपत्ती जवळपास एक तृतीयांश कमी झाली आहे. केमिकल्स, मेटल आणि सिमेंट क्षेत्रातील त्यांच्या इतर कपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे ज्याचा परिणाम त्यांच्या एकूण संपत्तीवर झाला आहे.

दोन वर्षात घटलं बिर्लांचं नेटवर्थ 
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार, गेल्या दोन वर्षांत बिर्लांचं नेटवर्थ 9.1 अब्ज डॉलरवरून घटून 6 अब्ज डॉलर राहिलं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीतील मोठा हिस्सा आदित्य बिर्ला ग्रुपमधून येतो जी त्यांची प्रमुख होल्डिंग्स आहे. गेल्या आठवड्यातील वोडाफोन-आयडियानं सप्टेंबर तिमाहीचा निकाल जारी केला ज्यात कंपनीला मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

हिंडाल्कोच्या नफ्यात घट-
याशिवाय आदित्य बिर्ला ग्रुपची सर्वात मोठी भागिदारी जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅल्युमिनिअम रोलिंग कंपनीत आहे. अ‍ॅल्युमिनिअम आणि कॉपर बनवणाऱ्या हिंडाल्कोचा नफा सप्टेंबर तिमाहीत 33 टक्के घटला आहे.

सप्टेंबर 2017 नंतर हिंडाल्कोच्या शेअर्समध्ये 31 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ज्यामुळे कंपनीच्या मार्केट व्हॅल्युमध्ये 5.9 अब्ज डॉलरची घट झाली आहे. यादरम्यान सेंसेक्समध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे.

ग्रासिम इंडस्ट्रीजवर दबाव 
भारतातही आर्थिक मंदीमुळे सिमेंटपासून ते केमिकल्स आणि टेक्स्टाईल्सच्या मागणीत घट झाली आहे. ग्रासिम इंडस्ट्रीमध्येही त्यांची भागिदारी आहे. वोडाफोन आयडियासाठीच्या अडचणींचा परिणाम ग्रासिम इंडस्ट्रीजवर झाला आहे.

Visit : Policenama.com