Sad News : कुमारमंगलम बिर्ला यांचे आजोबा उद्योगपती वसंतकुमार बिर्ला यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीके बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन वसंत कुमार बिर्ला यांचे बुधवारी मुंबई येथे निधन झाले. ते ९८ वर्षाचे होते. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचे आजोबा होते.

१५ व्या वर्षी घेतली होती जबाबदारी वसंत बिर्ला यांनी अवघ्या १५ व्या वर्षी व्यापार क्षेत्रामध्ये महत्वाची जबाबदारी स्वीकारली होती. ते उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे सर्वात लहान मुलगे होते. वसंत बिर्ला सर्वात पहिल्यांदा केसोराम इंडस्ट्रीजचे चेयरमैन झाले. येथूनच त्यांनी व्यापार क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेण्यास सुरवात केली.

कॉटन, विस्कॉस, पॉलिएस्टर, नायलॉन, रिफ्रेक्ट्री पेपर, शिपिंग, टायरकोर्ड, ट्रांसपेरेंट पेपर, सीमेंट, चाय, कॉफी, इलायची, केमिकल्स, प्लाईवुड, एमडीएफ बोर्ड या क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

१९९५ मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांचे वडील आदित्य बिर्ला यांचे निधन झाले. तो वसंतकुमार बिर्ला यांचा एकुलता एक मुलगा होता. वसंतकुमार बिर्ला सेंचुरी टेक्सटाइल अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन होते.