बाबासाहेबांचे नातू उमेदवारांची जात सांगत सुटलेत : कुमार सप्तर्षी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना प्रत्येक उमेदवाराच्या जातींचा देखील उल्लेख केला होता. त्यावरून जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी टीका केली आहे. ” प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांच्या विचारांचा आधार नाही. बाबासाहेब जाती निर्मूलनवादी होते पण त्यांचे नातू उमेदवारांची जात सांगत सुटले आहेत. अशी टीका कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

यावेळी बोलताना सप्तर्षी म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला कोणाचा आशीर्वाद आहे माहिती नाही. त्यांना काय साधायचे आहे हेही कळत नाही पण लोकांचे कन्फ्युजन करायचे आहे हे मात्र नक्की प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांच्या विचारांचा आधार नाही. बाबासाहेब जाती निर्मूलनवादी होते पण त्यांचे नातू उमेदवारांची जात सांगता सुटले आहेत. अशी टीका कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

तसेच यावेळी बोलताना भाजप भावनात्मक पातळीवर संमोहन करून मते मिळवत असल्याचा दावा देखील कुमार सप्तर्षी यांनी केला आहे. देशात दोनच पर्याय आहेत भाजप किंवा काँग्रेस. भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय ठरू शकतो असे देखील सप्तर्षी यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे मैदानात आहेत. सोलापूर मतदार संघात या दोघांच्यात चुरशीची लढत होणार असे सांगण्यात येत आहे.

उमेदवारांच्या नावापुढे जात का लावली ? आंबेडकर म्हणतात…
याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, “आज आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली.आमचं असं आहे की आम्ही एकदा निवडणूक जिंकलो की पुढे ते फक्त एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच काम करतील. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिलं आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे’, असे आंबेडकर यांनी सांगितले होते “.