इम्रान खान, ‘आता तुम्ही कटोरा घेऊन जगात सगळीकडं भीक मागा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदी जगतातले एक प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटर वर एक ट्विट केले आहे. त्यामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ट्विट मध्ये त्यांनी चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एक सल्ला दिला आहे. तो सल्ला म्हणजे, इम्रानक खान तुम्ही पुन्हा एकदा हातात कटोरा घ्या आणि जगभर भीक मागण्याच्या दौऱ्यावर जा. असे ट्विट मध्ये म्हटले आहे. यावरून समाजमाध्यमांवर कुमार विश्वास यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

इम्रान खान यांच्या ट्विटला चोख प्रतिउत्तर
भारत सरकारने जम्मू काश्मीरला विदेश दर्जा बहाल करणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान सबंध आणखीनच विकोपाला गेले आहेत. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान भारतावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. नुकतंच इम्रान खान यांनी जोपर्यंत भारत काश्मिरी नागरिकांवरील अन्याय बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारताशी कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाही. असे ट्विट केले होते. खान यांच्या याच ट्विटला डॉ. कुमार विश्वास यांनी असे उत्तर दिले आहे.

पाकिस्तानने काही तडकाफडकी निर्णय घेऊन आपली स्वतःची अर्थव्यवस्था आणखीनच खिळखिळी करून घेतली आहे. पाकिस्तानात रोजच्या वापरातील वस्तू जसे की, भाज्या , दूध , अन्नधान्य यांचे भाव अतिशय वाढले आहेत. तसेच देशात नेहमी सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानचा जगभरातून निषेध केला जात आहे. यामुळेच पाकिस्तानला जगभरातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीला खीळ बसत आहे. एकंदरीत अशी परिस्थिती असताना पाकिस्तानच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळेच कुमार विश्वास यांनी इम्रान खान यांना हातात कटोरी घेऊन भीक मागण्याच्या दौऱ्यावर जाण्याचा सल्ला दिला असणार.