कुमार विश्वास यांना देखील चोरट्यांनी सोडलं नाही, घरासमोरील ‘लक्झरी’ गाडी चोरीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी आमदार कुमार विश्वास यांच्या घरासमोरून त्यांची चारचाकी गाडी चोरून नेण्यात आली आहे. कुमार विश्वास यांच्या गाजियाबाद येथील घरासमोरून त्यांची फॉर्च्युनर गाडी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युपी पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे.

युपी पोलिसांनी विश्वास यांची तक्रार दाखल करून गाडी शोधण्यासाठी अनेक टीम बनवून तपास सुरु केला आहे. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जात आहेत. तसेच याबाबतची माहिती इतर पोलीस स्टेशनमध्ये देखील पाठवण्यात आलेली आहे.

कुमार विश्वास प्रसिद्ध व्यक्तिमत्व
साहित्य जगतामध्ये कुमार विश्वास हे सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. विश्वास हे आधी आम आदमी पक्षात कार्यरत होते. मात्र पक्षासोबत वाद झाल्याने त्यांनी पक्ष सोडला होता. विश्वास नेहमीच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतात. सध्या तिसऱ्यांदा केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यातच हे गाडी प्रकरण झाल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याबाबत चांगलेच प्रश्न विचारले आहेत.

AAP वर देखील हल्ला
कुमार विश्वास यांनी काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षावर देखील हल्लबोल केला होता. ते वारंवार अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या कामावर टीका करत होते. 2018 मध्ये आम आदमी पक्षाने संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता यांना राज्यसभेवर पाठवले होते. तेव्हाच कुमार विश्वास यांनी पक्षविरोधात आक्रमक पवित्र घेतला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like