‘आयफोन भी नोकिया से ‘उबर’ नही पाया’, कुमार विश्‍वासांची अर्थमंत्री सीतारमन यांच्यावर टीका

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून ऑटो मोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट आल्याची चर्चा आहे. ऑटो मोबाइल क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील रोजगारावरही याचा परिणाम दिसून आला आहे. याच अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधान केले होते की, ओला आणि उबेर सारख्या भाडे तत्वावर मिळणाऱ्या गाड्या वाढल्याने कारच्या विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या विधानाचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनींही सीतारामन यांच्या विधानाची खिल्ली उडवत एक ट्विट केले आहे.

कुमार विश्वास आपल्या ट्विटमध्ये म्हणतात आयफोनची विक्री या वेळीस जरा कमीच होत आहे. याला कारण मात्र मंदीचे नाही. पुढे कुमार विश्वास यांनी आपल्यातील कवी गुणांचा वापर करत ‘ओला’ आणि ‘उबेर’ शब्दाच्या माध्यमातून अत्यंत मार्मिक पद्धतीने सीतारामन यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात,  “आई फ़ोन अपेक्षा के अनुसार नहीं बिक रहा ! (मंदी कारण नहीं है, लगता है “नोकिया” के ज्यादा प्रयोग की “ओला”वृष्टि से “ऊबर” नहीं पाया”

तत्पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो मोबाइल क्षेत्रात निर्माण झालेली ही समस्या अत्यंत गंभीर असून यावर लवकरच तोडगा काढला गेला पाहिजे असेही सूचक विधान केले होते.