#Surgicalstrike2 : पुरावे मागणाऱ्यांच्या हातात ’१०० ग्रॅम बॉम्ब द्या 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक-२ चे कोणी पुरावे मागितले तर पुरावे मागणाऱ्यांच्या हातात काही १०० ग्रॅमचा बॉम्ब द्या…! असा टोला प्रसिद्ध कवी व आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. कुमार विश्वास यांनी भारतीय वायूसेनेच्या शौर्याचे कौतुक करत केजरीवालांवर निशाणाही साधला आहे. केजरीवाल यांनी ‘उरी’ हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. त्या संदर्भात विश्वास यांनी हे ट्विट केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली आहे.

२०१६ मध्ये उरीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केला होता. केजरीवाल यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याचे पुरावे देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर  विश्वास यांनी केजरीवाल यांना टोला हाणला आहे. ‘आजच्या हवाई हल्ल्याचे कोणी पुरावे मागितले तर त्यांना १०० ग्रामचा बॉम्ब द्या,’ असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/DrKumarVishwas/status/1100242767777857542
इम्रान खान यांच्यावरही टीका –
इम्रान खान यांच्यावर टीका करताना कुमार विश्वास म्हणाले की, ‘अनेक दिवसांपासून बालाकोटवाले भारतीय टोमॅटोसाठी रडत होते. भारतीय वायूसेनेने त्यांना एका रात्रीत हजार टनांची पहिली खेप जैश ए मोहम्मदच्या कंट्रोल रूमला पाठवली आहे. शांततेचा पांढरा रंग तर तुम्हाला समजत नाही. आता इमरान खान यांना लाल रंग पसंत पडला असेल अशी आशा आहे.

https://twitter.com/DrKumarVishwas/status/1100239527044702209
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मंगळवारी मोठा कारवाई केली. वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला आहे. त्यानंतर भारतातील अनेक सेलेब्रेटी, खेळाडू, राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटरद्वारे देत भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले आहे.