कुमारस्वामी होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

बंगळुरुः वृत्तसंस्था

येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिवसभराच्या राजकिय घडामोडीनंतर कर्नाटक नाट्य आता थांबले आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. येडियुरप्पांचे भाषण संपताच कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांनी परस्परांशी हस्तांदोलन करत आनंद व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभेची स्थिती ही त्रिशंकू सारखी निर्माण झाली होती. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे कोणता पक्ष कोणाच्या मदतीने सत्ता स्थापन करतो याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच भाजपने सत्ता स्थापन करत येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र सुप्रिम कोर्टाने बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली. त्यामध्ये भाजप बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले. काॅंग्रेस पक्षाने सुरूवातीपासूनच जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता याच पाठिंब्यावर जेडीएस चे नेते कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत.

संबंधित घडामोडी:

कर्नाटकात काँग्रेस,जेडीयुची खरी परिक्षा
येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटकात उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट
कर्नाटक : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे २८ तास
कर्नाटक : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार
सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ