कुंभमेळा 2019 च्या शाहीस्नान ‘या’ दिवशी होणार 

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो.  जेथे देश-विदेशातून अनेक भाविक येत असतात.

कुंभमेळा 12 वर्षातून एकदा येतो. 2 कुंभमेळ्यामध्ये एक अर्धकुंभ देखील येतं. कुंभमेळा हा मकर संक्रांतीला सुरु होतो. या दिवशी कुंभस्नानाचा योग असतो. हिंदू धर्मानुसार अशी मान्‍यता आहे की, कुंभमेळ्यात पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास मनुष्य पापमुक्त होतो आणि मनुष्‍यला जन्म-पुनर्जन्म किंवा मृत्यु-मोक्ष प्राप्त होतो.

 [amazon_link asins=’B074HVB8QR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4017bed-995f-11e8-a53c-dfc481f3fd57′]
2019 मध्ये इलाहबाद येथे कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याची तारीख जाहीर झाली आहे. कुंभमेळा पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्य़टक देखील आवर्जून येत असतात.

2019 कुंभमेळ्यातील शाहीस्नान

 

14-15 जानेवारी 2019: मकर संक्रांती (पहलं शाही स्नान)
21 जानेवारी 2019: पौष पोर्णिमा
31 जानेवारी 2019: पौष एकादशी स्नान
04 फेब्रुवारी 2019: मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दूसरं शाही स्नान)
10 फेब्रुवारी 2019: वसंत पंचमी (तीसरं शाही स्नान)
16 फेब्रुवारी 2019: माघी एकादशी
19 फेब्रुवारी 2019: माघी पोर्णिमा

04 मार्च 2019: महाशिवरात्री

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/