कुंभ मेळा : किन्नर आख्याड्याने केले प्रथम शाही स्नान 

लखनऊ/प्रयागराज : वृत्तसंस्था – प्रयागराज कुंभ मेळ्यात मकर संक्रांतीच्या दिवशी पहिले शाही स्नान उत्साहात पार पाडले. संगमनगरीच्या संगम तटावर भाविकांनी मोठी गर्दी केली. महानिवार्णी अखाड्यासोबत यंदा प्रथमच किन्नर आखाड्याने देखील शाही स्नानात सहभाग घेतला आहे. तर लाखोंच्या संख्येने भाविक कुंभ मेळ्याला आले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कुंभ मेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाला डुबकी लावून ‘हर हर गंगे’ अशी  ट्विटर वर पोस्ट करत फोटो शेअर केला आहे.
सर्वात शेवटी झाले ‘या’ आखाड्याचे शाही स्नान… 
 
वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार, सकाळी 6.15 वाजता पहिले महानिर्वाणी अखाड्याने शाही स्नान केले. त्यानंतर अटल अखाड्याच्या महामंडलेश्वर, मंडलेश्वर, महंत व श्रीमहंत यांनी शाही स्नान केले. दुपारी 3.40 सगळ्या आखाड्याच्या साधु-संतांनी शाही स्नान करतील. सगळ्यात शेवटी निर्मल अखाड्याचे साधू स्नान करतील. श्री पंचायती निरंजानी आखाडा आणि तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्यातील संतांनि शाही स्नान पूर्ण करून दोन्ही आखाड्यांचे संत आपआपल्या शिबिराच्या ठिकाणी आता प्रस्थान करत आहेत.
कुंभ मेळा २०१९ चे हे आहेत खास वैशिष्ट्ये 
* यावेळी कुंभ मेळा ४५ चौरस किमी पर्यंत पसरला असून
* कुंभ मेळ्यासाठी ६०० स्पयंपाक घरांचे नियोजन करण्यात आले आहे .
* त्याचबरोबर दुधाचे ४८ बूथ लावण्यात आले असून.
* २०० एटीएमची सुविधा करण्यात अली आहे.
* ४ हजार हॉट स्पॉट्स
* १.२० लाख बायो टॉयलेटची व्यवस्था करण्यात अली आहे.
* ८०० विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात अली आहे.
* त्याचबरोबर ३०० किमी पर्यंत नवीन रस्ते देखील तयार करण्यात आले असून
* ५ लाख वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था देखील करण्यात अली आहे.