कुमकुम भाग्य फेम ’इंदू दादी’ यांचे निधन, को-स्टार्सने व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कुमकुम भाग्य(kumkum bhagya)फेम ’इंदु दादी’ उर्फ झरीना रोशन खान यांचे 54 व्या वर्षी अचानक निधन झाले. कार्डीअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. झरीना यांच्या मृत्यूमुळे त्यांचे को-स्टार्स आणि कुमकुम भाग्य(kumkum bhagya)च्या अ‍ॅक्टर्सना धक्का बसला आहे. सर्वांनी झरीना यांच्या सोबतच्या जुन्हा आठवणी सांगून दु:ख व्यक्त केले आहे.

टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्रृती झा ने झरीना यांच्या सोबतचा एक फोटो आणि झरीना यांचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. तिने ब्रोकन हार्ट इमोजी टाकून आपले दु:ख व्यक्त केले आहे. तर अ‍ॅक्टर शब्बीर अहलुवालियाने झरीना यांच्यासोबतचा फोटो शेयर करून लिहिले आहे – ’वो चांद सा रोशन चेहरा’. या फोटोवरून समजते की, झरीना यांचे आपल्या को-स्टार्ससोबत चांगले बॉन्डींग होते.

एक न्यूज पोर्टलसोबत बोलतना अ‍ॅक्टर अनुराग शर्माने या वृत्ताला दुजोरा दिला. त्याने झरीना यांच्या पर्सनालिटीबाबत सांगितले की – झरीना एक उमदे व्यक्तीमत्व होते. त्यांच्यात नेहमी एनर्जी भरलेली असायची. मला वाटते की, त्यांनी आपल्या करीयरची सुरूवात बहुतेक एक स्टंट वुमन म्हणून केली होती आणि त्या रियल लाइफमध्ये एका फायटरप्रमाणे होत्या. आम्ही मागच्याच महिन्यात सोबत शूट केले होते आणि त्यावेळी त्या एकदम ठणठणीत होत्या, पण अचानक आम्हाला ग्रुपमध्ये ही बातमी समजली.

झरीना यांनी कुमकुम भाग्य शिवाय ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये सुद्धा काम केले होते. कुमकुम भाग्यमध्ये इंदु दादीच्या भूमिकेमुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या जाण्याने टीव्ही जगतातील एक तारा नेहमीसाठी विझला आहे.