महामोर्चासाठी कुणबी समाजातील महिला एकवटल्या

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील कुणबी समाजावर पर्यायाने ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढा देण्यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन कुणबी समाज संघटनेने महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात महिलांचा सहभाग राहावा, यासाठी महिलांची सभा घेण्यात आली. या सभेला उपस्थित महिलांनी महामोर्चात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणबी समाज संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी २७ डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीवर महामोर्चाचे आयोजन केले आहे.

या मोर्चाच्या नियोजनासाठी कुणबी महिला समाज संघटनेची सभा शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील विविध भागातील शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवित महामोर्चांतील कामे आपण करणार, अशी ग्वाही यावेळी आयोजन समितीला दिली. दरम्यान, महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध मागण्यांवर चर्चा करून समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर महामोर्चाची जनजागृती करण्याकरिता २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता बाईक रॅली काढण्याचे निश्चित करण्यात आले. ही बाईक रॅली महिलांच्या पुढाकारात काढण्याचेही निश्चित करण्यात आले. सोबतच मेळाव्याच्या दिवशी शहरातील महिला स्वयंसेवकांचे काम करणार असल्याचे आयोजन समितीला उपस्थित महिलांना सांगितले.

या बैठकीला सिनेट सदस्य संध्या येलेकर, रेखा ब्राम्हणवाडे, विमल भोयर, कुसूम भोयर, मिनाक्षी ठाकरे, करूणा ब्राम्हणवाडे, शुभांगी वाघरे, कविता वाघरे, नगरसेविका वर्षा बट्टे, ललिता ब्राम्हणवाडे, सोनाली ठाकरे, अनुसया ठाकरे, राखी उरकुडे, रेखा देवाळकर, हर्षदा धंदरे, मेघा उरकुडे, संगीता म्हशाखेत्री, वैशाली विधाते, धनश्री ठाकरे, अवंती धंदरे, रजनी धंदरे, विजया रडके, शुभांगी नवघरे, वैशाली लोंढे, आशा खांडेकर, वर्षा कोहपरे, रंजना चुधरी, वैशाली जाधव, अश्विनी गोंगल, संध्या शिवणकर,रजनी दोनाडकर, धनश्री वाघरे, ज्योती म्हशाखेत्री, विद्या म्हशाखेत्री, सारिका घोटेकर, सुचिता चौधरी, मेघा उरकुडे, मेघा कुरवटकर, माधुरी लडके, अवंती धंदरे, अरूणा गोहणे, वैशाली भोयर आदी महिला उपस्थित होत्या.

आम्ही शासक होतो, पण जातीयवाद्यांनी आम्हाला शुद्र बनविले : प्रा.रामचंद्र भरांडे