Homeताज्या बातम्याPune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर...

Pune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यात शेतकरी कुटुंबातील (Farmer family) होमगार्ड (Homeguard) पथकात कार्यरत असणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला काही दिवसांपूर्वी बहिणीने यकृत (Liver) दान केले होते. मात्र, भावाची गुरुवारी रात्री प्राणज्योत मालवली. कुणाल दिलीप पावडे (Kunal Dilip Pavade) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी कि कुणालला Kunal Pavade कावीळ आजाराने ग्रासले होते. त्याच्यावर पिंपरी चिंचवडमधील एका खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टरांनी त्याची किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. १५ ते २० लाख रुपयांचा अपेक्षित खर्च या शस्त्रक्रियेसाठी लागणार होता. कुणालची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या मित्रांनी, गावकऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी कुणालच्या उपचारासाठी सोशल मीडियावर मदतीची साद घातली. त्यातून समाजातील असंख्य मदतीचे हात येऊन ९ ते १० लाख रुपयांची मदत गोळा करण्यात आली होती. दरम्यान त्याच्या दोन बहिणींपैकी रेणुका महिंद्रा शिंदे हिने आपल्या भावाला यकृत दान केले होते. रुबी हॉलमध्ये २ जूनला यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. सुखरूप बाहेर आली. पण कुणाल शुद्धीवर येत नव्हता. ९ दिवसानंतर म्हणजे गुरुवारी कुणालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, कुणालाची Kunal Pavade परिस्थिती गरीब असून रुबी हॉल रुग्णालयाचे साडेचार लाख बिल देणे आहे. गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर कुणालचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणे आवश्यक होते मात्र जो पर्यंत राहिलेले बिल देत नाही तो पर्यंत मुतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला.१८ तास उलटले तरी मुतदेह ताब्यात दिला गेला नाही. कुणालच्या कुटूंबियांनी आजपर्यंत १२ लाख ५० हजार रुपये रुग्णालयात भरले असून मृत्यूनंतरही कुणालची परवड सुरू आहे.

Web Title :- Kunal Dilip Pavade Pune News|brother who donated liver his sister died during treatment nine days

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News