Kunal Shailesh Tilak | कसबा पोटनिवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुणाल टिळकांच्या फसवणुकीचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या (BJP) उमेदवारीसाठी चर्चेत असलेले कुणाल शैलेश टिळक (Kunal Shailesh Tilak) यांना सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) समोर आला आहे. तुमचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तिकीट निश्चित झाल्याचे सांगून कुणाल टिळक (Kunal Shailesh Tilak) यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुणाल टिळक यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Kasba Bypoll Elections) जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) इच्छूकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. मात्र, मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) किंवा मुलगा कुणाल टिळक (Kunal Shailesh Tilak) यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

 

कुणाल टिळक यांच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला.
मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून (BJP Central Office) बोलत आहे, असे सांगितले.
यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने कुणाल यांना ‘तुमचे आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट निश्चित झाले आहे’, असे सांगितले.
‘तिकीट निश्चित झाल्यामुळे तुम्ही यूपीआय ने या क्रमांकावर 76 हजार रुपये पाठवा’ असेही सांगितले.
आपली फसवणूक (Cheating) करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कुणाल यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी अद्याप गुन्हा (FIR) दाखल केलेला नाही.

 

Web Title :- Kunal Shailesh Tilak | the lure of cyber thieves to get ticket for kunal tilak in the by elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी