…म्हणून धोनीचे चाहते भडकले कुलदीप यादववर

मुंबई : वृत्तसंस्था – माहीभाई यष्टीमागून ज्या काही टिप्स देतो त्या फार महत्वाच्या असतात, काहीवेळा त्या काम करतात, मात्र खूप वेळा त्या काम करत नाही असे म्हटल्याने भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याला नेटीझनस्नी चांगलेच ट्रोल केले आहे. सोमवारी CEAT पुरस्कार वितरण सोहळ्यात फिरकीपटू कुलदीप यादवला outstanding performance of the year पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी बोलताना त्याने हे भाष्य केले आहे. धोनीविषयी विचारलेल्या प्रश्नावर तो बोलत होता .

प्रत्येक वेळी यश नाही 

यावेळी बोलताना तो म्हणाला कि, धोनीचे सल्ले फारच उपयोगी असतात, तो मागून आम्हाला गोलंदाजी करताना सल्ले देत असतो. काही वेळेला ते सल्ले कामी येतात, मात्र काहीवेळा त्यामुळे आम्हाला मार देखील पडतो. परंतु आम्हाला धोनीला याविषयी काही बोलता येत नाही. यानंतर कुलदीप यादव याला धोनीच्या चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केलं. कुलदीप यादवने २०१७ साली भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे.

दरम्यान, त्याचवेळी भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल मात्र धोनीच्या टिप्स फारच उपयोगात येतात असे म्हणत आहे. धोनीच्या मार्गदर्शनामुळे आमची बळी घेण्याची भूक वाढली. आम्ही प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न करत असतो, असेही पुढे बोलताना चहल म्हणाला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like