Kundlik Khande | ‘पोलीस उपाधीक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली’, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस उपाधीक्षकांनी (Deputy Superintendent of Police) शिवसेनेला  (Shiv Sena) बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचा घणाघाती आरोप गुटखा प्रकरणात दोषी असलेले बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांनी केला आहे. आरोप कोर्टात सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल. कोणत्याही व्यासपीठावर येणार नाही, असं देखील कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांनी म्हटले आहे. गुटखा प्रकरणात (Gutkha Case) दोषी असलेले बीडमधील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुरुवारी (दि.25) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

 

केज पोलीस ठाण्याच्या (Kej Police Station) हद्दीत आढळलेल्या गुटखा प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे
(Kundlik Khande) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर शिवसेनेकडून त्यांच्या पदाला स्थगिती दिली. परंतु खांडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
न्यायलयाने आपल्याला कायमस्वरुपी क्लिनचीट दिली असल्याचा दवा खांडे यांनी केला आहे.

 

बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी काही दिवसांपूर्वी नांदूरघाट, इमारपूर आणि बीडमध्ये गटख्याच्या गोदामावर छापे टाकले होते.
यामध्ये तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हेच प्रमुख आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार असल्याचे पोलीस रेकॉर्डवर आहे.

दरम्यान, सचिव, खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्याच्या (Beed) दौऱ्यावर आले होते.
त्यांच्या स्वागतासाठी पोलीस रेकॉर्डवरील फरार असलेले खांडे कार्यक्रमाला हजर होते.
विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या समोर फरार आरोपी खांडे हजर होते.
तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं.
याप्रकरणाची राज्यभरात चर्चा झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पदाला स्थगिती दिली होती.

 

कुंडलिक खांडे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना म्हटले, की मला या प्रकरणात गुंतवले जात आहे.
तसेच कलम 169 नुसार माझे नाव या प्रकरणातून वगळण्यात येणार आहे. तसे पोलिसांनी मला सांगितले आहे.
कार्यकर्त्यांचा फोन आला म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. यात माझा कसलाही संबंध नाही. मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.

 

Web Title : Kundlik Khade | shiv sena leader kundlik khade allegations on beed deputy superintendent of police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IND Vs NZ Test Series | कानपूर कसोटीवर वसीम जाफरचे ‘ते’ ट्विट तुफान व्हायरल

World Top Business Family | जाणून घ्या अमेरिकेच्या वॉल्टन कुटुंबाने कशी केली होती ‘गडगंज’ संपत्तीची ‘वाटणी’, तसंच करायचंय रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना!

HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई इथे भरती; पगार 1,31,000 रुपयापर्यंत, जाणून घ्या