कुपवाड : तरूणावर प्राणघातक हल्ला

कुपवाड : पाेलीसनामा ऑनलाईन

मारामारीचा राग मनात धरुन एकाेणविस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राचा वापर करुण प्राणघातक हल्ला केल्याची घटना कुपवाडी मिरज रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाडण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. निलेश विठाेबा गडदे (वाघमाेडेनगर, कुपवाड) असे जखमिचे नाव असून, मिरजेतील सिव्हील हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab3aee15-b9c2-11e8-8f5c-f3333e1b63d2′]

कुपवाड पोलिसांनी संशयित मुख्य सुत्रधार राहूल मोहन नाईक(वय-20,रा. मायाक्कानगर, बामणोली) यांच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,  शनिवारी दुपारी जखमी निलेश व संशयित राहूल यांच्यात बामणोली(ता.मिरज) येथील मायाक्कानगर मध्ये लहान मुलांच्या भांडणातून बाचाबाची झाली यावेळी निलेशने राहूलला मारहाण केली होती. या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने बामणोलीतील दोन अल्पवयीन साथीदारांना बोलावून निलेश ला जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
[amazon_link asins=’B075F4QR9J,B077ZXRB5W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1026bcf-b9c2-11e8-98e1-cbae2890af4e’]

निलेश कुपवाड मिरज रस्त्यावरून वाघमोडेनगरकडे जात असताना ओढ्याच्या पुढे आल्यावर पाठीमागून आलेल्या संशयित राहूल व त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने खिशातून धारदार चाकू काढून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या दोघांनी त्याच्या पाठीत खोलवर व डाव्या हातावर गंभीर वार करून जखमी केले. व लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली.वार खाेलवर लागल्यामुळे निलेश रक्ताच्या थारोळ्यात पडला हे बघून तिघांनी पळ काढला. या घटनेची माहिती एकाने कुपवाड पोलिसांना दिली.

निलेश याने तीन जणांनी माझ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार शनिवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिसात दिली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी या हल्ल्यातील फरारी तीनही संशयितांचा शोध घेऊन मुख्य सुत्रधार राहूल नाईक याला अटक केली असून त्याच्या दोन्ही अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
[amazon_link asins=’B07811Y98Q,B077ZZ83ZS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6600510-b9c2-11e8-bff0-97b7bf8ec80b’]

सहाय्यक निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या उपस्थितीत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोजारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्याचेवर उपचार सुरू आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.