Kushal Badrike | कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधले सगळ्यांचे लक्ष; म्हणाला “कशालाच काही अर्थ नाही…”

पोलीसनामा ऑनलाईन टीम : झी मराठी वाहिरीवरील ‘चला हवा येऊ द्या’च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो. कुशल ने फु बाई फु या कार्यक्रमातही लोकांना खळखळून हसवलं. त्याने जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, माझा नवरा तुझी बायको चित्रपटामध्ये देखील वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तसेच भाऊ कदम आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत झळकले होते.

 

कुशल (Kushal Badrike) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

 

त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय कि “कशालाच काही अर्थ नाही” ह्या भावनेची व्याप्ती खूप मोठी आहे.
एखादया “black hole” सारखी, सगळं शून्य करुन टाकणारी ! पण “प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ हवा”,
ह्या गोष्टीला तरी काय अर्थ आहे ? कुशलने ही पोस्ट नक्की का शेअर केली? याबद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहे.
त्याच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करतानाही दिसत आहेत. एका चाहत्याने ‘पण, एक कलाकार मनापासून जेव्हा हे म्हणतो.. तेव्हा त्याला नक्कीच काहीतरी ‘अर्थ’ हा असतोच असतो’, अशी कमेंट केली आहे.

 

Web Title :- Kushal Badrike | marathi actor kushal badrike share black shirt photo with interesting caption goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amrawati Crime News | नैराश्याच्या भरात 24 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, अमरावतीमधील घटना

Jalna ACB Trap | 8 लाख 53 हजार रुपये लाच घेताना उपविभागीय जलसंधारण अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले…