… म्हणून अभिनेता कुशल पंजाबीनं केली आत्महत्या ! पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येविषयी एक नवीन अपडेट समोर आले आहे. कुशल पंजाबीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट मिळाली आहे. DCP परमजीत सिंह दहिया यांनी कुशल पंजाबीच्या आत्महत्येशी संबंधित डिटेल शेयर केले आहेत.
कुशल पंजाबीच्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले होते?
DCP परमजीतसिंह दहिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले की, ””हो, ही आत्महत्येची घटना आहे.” त्याचे पालक दुपारपासूनच त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. पण कुशलचा फोन उपलब्ध नव्हता. त्यांनी रात्रीपर्यंत वाट बघितली, जेव्हा कुशलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा ते रात्री १०.३० वाजता कुशलच्या इमारतीत पोहोचले. कुशल घरी एकटा होता. त्यामुळे त्याचे पालक दरवाजा तोडून आत गेले. घरात शिरताच त्यांनी कुशलचा मृतदेह पंखावर लटकलेला पाहिला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. आम्ही आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.”
DCP म्हणाले की, कुशलने सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कुणालाही दोषी ठरवले नाही. दुसरीकडे अशीही बातमी येत आहे की, कुशल आर्थिक संकटात होता. त्यांच्याकडे काम नव्हते. व्यावसायिक जीवनाचा त्रास त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही पडत होता.
कुशल पंजाबीने नोव्हेंबर २०१५ मध्ये आपली युरोपियन मैत्रीण Audrey Dolhenबरोबर लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. कुशल त्याच्या मुलावर खूप प्रेम करत होता. आत्महत्येपूर्वी कुशलने मुलाचा फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केला होता. चित्रावर हार्ट इमोजी बनवले गेले होते.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- आरोग्यासाठी लाभदायक आक्रोड, खरेदी करताना ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा
- ‘ही’ आहेत मासिक पाळीच्या अनियमिततेची ५ कारणे !
- त्वचेचे सौंदर्य राखतील ‘ही’ ४ व्हिटॅमिन्स, जाणून घ्या फायदे
- PCOS वर नियंत्रण असे मिळवा, ‘ही’ आहेत १२ लक्षणे
- चमकदार त्वचेसाठी बेसन वापरून बनवा ‘हे’ ५ फेसपॅक !