अभिनेता कुशल पंजाबीनं मुलाचा फोटो शेअर करून स्वतःला संपवलं, सुसाईड नोट मध्ये लिहीलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीचा चा अत्यंत लोकप्रिय अभिनेता कुशल पंजाबीने अचानकपणे आत्महत्या केल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अवघ्या ३७ व्या वर्षा त्याने आपले जीवन संपविले आहे. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीबरोबरच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुशलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. डीटीपी परमजीत सिंह दहिया यांनी कुशलच्या सुसाईड नोटबद्दलचे तपशील शेअर केले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशलचे आई-वडील दुपारपासून आपल्या मुलाशी फोनवर बोलण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण कुशलचा फोन बंद येत होता. रात्र झाली तरी कुशलची काहीच संपर्क होत नव्हता. काहीच संपर्क होत नसल्यामुळे त्याचे आई-वडील रात्री 10.30 वाजता तो राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये गेले. त्यावेळी कुशल घरात एकटा होता. आई-वडीलांनी दरवाजा तोडला असता त्यांना कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. कुशलच्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याते नमूद आहे. या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने म्हटले आहे.

कुशलची शेवटची पोस्ट
कुशलने नोहेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्याशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगा आहे. कुशलचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते. आत्महत्या करण्याआधी कुशलने आपल्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर त्याने मुलाचा फोटो शेअर करुन हार्टचे ईमोजी टाकून फोटो शेअर केला होता. कुशलची ही शेवटची पोस्ट होती.