Coronavirus Lockdown : घराला आग लागल्यानं 2 निष्पाप मुलांचा होरपळून मृत्यू, ‘कोरोना’च्या भीतीनं कुटुंबानं लावलं होतं कुलूप

कुशीनगर/ उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच नगरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. देशातील अनेक राज्यामध्ये लॉकडाऊनचा परिणाम दिसून येत आहे. लोकांनी स्वत: घरामध्ये क्वारंटाईन करून घेतले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातून दुर्दैवी घटना समोर येत आहे.

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे एका घराला आग लागल्यामुळे घरातील दोन निष्पाप मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना पडरौना कोतवालीच्या गांभिया गावात घडली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कुटुंबाने आपल्या दोन लहान मुलांना घरातील दरवाजा बंद करून ठेवले होते, अशी माहिती समोर येत आहे. पालकांनी मुले घराबाहेर पडू नयेत यासाठी दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते.

लहान मुले घरात असताना घरातील गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाली. त्यामुळे घराला आग लागली. बाहेरून दरवाजाला कुलूप असल्याने ही दोन लहान मुले घराबाहेर पडू शकली नाहीत. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता.

ही दु:खद घटना पडरौना कोतवालीच्या गंभीया गावातील बसंतपूर भागात घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर घरात बंद असलेल्या दोन लहान मुलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेरून घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like