KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – KVP | पोस्टाचे योजनांमध्ये पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. चांगला परतावाही मिळतो. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून अनेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. (KVP)

 

पोस्ट ऑफिसची ही योजना किसान विकास पत्र (kisan vikas patra scheme) बचत योजना आहे. त्यावर आता 6.9% व्याज मिळत आहे. हा व्याजदर देशातील अनेक बँकांच्या FD वर उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. देशातील अनेक मोठ्या बँका एफडीवर 5 ते 6 टक्के व्याज देत आहेत.

 

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

– हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असते जे बॉण्डप्रमाणे दिले जाते.

त्यावर ठराविक दराने व्याज मिळते.

सध्या यावर 9 टक्के व्याज दिले जात आहे.

हे देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येते.

किती गुंतवणूक करू शकता

KVP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही.

किमान गुंतवणूक रु 1000 असावी.

100 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतविली जाऊ शकते.

 

अकाऊंट होऊ शकते ट्रान्सफर

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक व्यक्ती योजनेचे प्रमाणपत्र दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकते.

एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट ट्रान्सफर देखील करता येते.

 

एकल आणि संयुक्त खाते सुविधा

या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते.

खाते उघडणार्‍याचे वय किमान 18 वर्षे असावे.

अल्पवयीन व्यक्तीदेखील खाते उघडू शकते, परंतु याची देखरेख पालकांना करावी लागेल.

 

लॉकिंग कालावधी

योजनेचा लॉक-इन कालावधी अडीच वर्षांचा आहे.

याचा अर्थ तुम्ही अडीच वर्षे पैसे काढू शकत नाही.

 

किती कालावधी पैसे होतात दुप्पट?

सध्याच्या 9 टक्के वार्षिक व्याजदरानुसार, पैसे सुमारे 10 वर्षे 4 महिन्यांत (124 महिने) दुप्पट होतील.

 

 

Web Title :- KVP | in kisan vikas patra scheme your money will be doubled in so many months know the details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता

 

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

New GST Rules | GST नियमांची काळजी घ्या ! आजपासून नवे बदल लागू

 

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना