KVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट दुप्पट होतील पैसे; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

नवी दिल्ली : KVP | गुंतवणूक करणे एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात नेहमी आपली बचतच उपयोगी येते. परंतु व्यक्ती याच गोंधळात असतो की, कधी गुंतवणूक करावी, जिथे त्याचे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगले रिटर्न मिळेल. आज आम्ही एक अशी योजना सांगणार आहोत ज्यामध्ये पैसे सुरक्षित राहतील आणि मॅच्युरिटीवर डबल रिटर्न मिळेल. ही पोस्ट ऑफिस (Post Office) ची किसान विकासपत्र KVP (Kisan Vikas Patra) योजना आहे. याबाबत सर्व जाणून घेवूयात…

 

किसान विकासपत्र भारत सरकारची एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जिथे एका ठराविक कालावधीत पैसे दुप्पट होतात. किसान विकासपत्र देशातील सर्व पोस्ट कार्यालये आणि मोठ्या बँकांमध्ये मिळतात. याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महिने आहे.

 

यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपयांची करता येते. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. हा प्लान विशेषता शेतकर्‍यांसाठी बनवला आहे, जेणेकरून ते मोठ्या कालावधीपर्यंत आपले पैसे वाचवू शकतील. (KVP)

 

कोण करू शकतात गुंतवणूक?

किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्‍याचे वय किमान 18 वर्षे असणे जरूरी आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटसुद्धा काढू शकता. ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा आहे. ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू विभक्त कुटुंबांना वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे.

 

व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे 124 महिन्यात (10 वर्षे आणि 4 महिने) डबल होतील. उदाहरणार्थ तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत, तर 124 महिन्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.

 

ट्रान्सफर करण्याची सुद्धा आहे सुविधा

किसान विकास पत्र जारी करण्याच्या तारखेच्या अडीच वर्षानंतर पूर्तता केली जाऊ शकते.
केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा स्थलांतरित करता येते.
किसान विकास पत्र एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला हस्तांतरीत करू शकते.
केव्हीपीमध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी करण्यात येते.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा