KXIP vs RR : ’यूनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने रचला इतिहास, टी-20 क्रिकेटमध्ये ‘असं’ करणारा पहिला फलंदाज

KXIP vs RR : आयपीएल 2020 च्या 50व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विरूद्ध ’यूनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने 99 धावांची तूफान खेळी केली. या दरम्यान त्याने सहा चौकार आणि आठ षटकार लगावले. यासोबतच गेलच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 1,000 षटकार झाले. टी20 क्रिकेटमध्ये असे करणारा गेल पहिला फलंदाज ठरला आहे.

गेल जेव्हा राजस्थानच्या विरूद्ध फलंदाजी करण्यासाठी आला होता, तेव्हा तो हा विक्रम करण्यापासून सात षटकार दूर होता. अशात गेलने तूफानी फलंदाजी करत खेळाच्या 19व्या षटकात कार्तिक त्यागीच्या पाचव्या चेंडूवर आपल्या करियरचा 1000वा षटकार ठोकला. राजस्थानच्या विरूद्ध गेलने आपल्या खेळीत एकुण आठ षटकार मारले. परंतु तो शतक बनवू शकला नाही आणि 99 धावांच्या स्कोअरवर बोल्ड आऊट झाला. गेलला जोफ्रा आर्चरने पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

टी20 क्रिकेटमध्ये गेलचा हा विक्रम तोडणे आता अशक्य मानले जात आहे. कारण या लिस्टमध्ये दुसर्‍या नंबरवर किरण पोलार्डचे नाव आहे. पोलार्डच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 690 षटकार आहेत आणि गेलच्या नावावर 1,000 षटकार झाले आहेत. पोलार्ड गेलच्य खुप पाठीमागे आहे, यसाठी गेलचा हा रेकॉर्ड लवकर तुटणे अशक्य मानले जात आहे.

मात्र, 99 धावा बनवूनही क्रिस गेल यास शतक मानतो. पंजाबचा खेळ संपल्यानंतर गेलने म्हटले की, त्याची खेळी शतकापेक्षा कमी नाही.

गेलच्या या खेळीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सच्या विरूद्ध अगोदर खेळल्यानंतर 20 ओव्हरमध्ये चार विकेटमध्ये 185 धावा बनवल्या आहेत. गेलशिवाय पंजाबसाठी कर्णधार केएल राहूलने 41 चेंडूत 46 आणि निकलोस पूरनने 10 चेंडूत 22 धावा बनवल्या.