‘रिअ‍ॅलिटी स्टार’ कायली जेनरसाठी प्रेग्नंसी का होती खास ? तिनं सांगितलं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिअ‍ॅलिटी स्टार कायली जेनर बॉयफ्रेंड ट्रॅव्हिस स्कॉटसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. याबाबत बोलताना कायली म्हणाली होती की, तिच्यात आणि बॉयफ्रेंडमध्ये सगळं काही ठिक आहे. कायली आपल्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी फेब्रुवारीत तिने मुलीला जन्म दिला होता.

https://www.instagram.com/p/B3aJcDcH_di/

आपल्या प्रेग्नंसीबद्दल बोलताना कायली म्हणाली होती की, तिला नेहमी यंग आईच्या रुपात स्वत:ला पहायला आवडतं. तिने आपल्या सगळ्याच बदलांना स्वीकार केलं. कायलीला तिच्या चाहत्यांनी विचारले की, प्रेग्नंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येणं अवघड होत का ? याचं उत्तर देताना ती म्हणाली, “मी लवकरच शेपमध्ये आले होते. परंतु हे नेहमीच नाही होऊ शकत. प्रत्येक वेळेस परिस्थितीवर असतं.”

https://www.instagram.com/p/B3FLM8Zn9hL/

कायली म्हणाली, “मी पुन्हा शेपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. याने थोडासा वेळ घेतला.” एका चाहत्यानं तिला विचारलं, “प्रेग्नंसीनंतर आलेले स्ट्रेच मार्क तू कसे घालवलेस ?” यावर कायली म्हणाली, “माझ्या ब्रेस्टवर आताही स्ट्रेच मार्क्स आहेत. मला अजूनही ते हटवणं जमलं नाही. मी त्यांना माझ्या स्टॉर्मीचं(मुलगी) गिफ्ट म्हणून अॅक्सेप्ट केलं आहे.”

एका चाहत्यानं विचारलं की, प्रेग्नंसीदरम्याचा तुझा आवडता आणि खास वेळ कोणता होता ? कायली म्हणाली, “आपल्या बाळाच्या मोठं होण्याच्या फीलींगव्यतिरीक्त जास्त आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नसते. माझ्यासाठीही ही वेळ सर्वात खास होती.”

https://www.instagram.com/p/B3FzI8jJNNt/

आपल्यामध्ये आणि आपल्या बॉयफ्रेंडमध्ये सर्वकाही ठिक असल्याचं सांगत तिने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तिने ट्विट करत म्हटलं होतं की, “ट्रॅव्हिस आणि माझ्यात सर्वकाही ठिक आहे. आमचं सगळं लक्ष स्टॉर्मीवर आहे. आमची मुलगीच आमची प्राथमिकता आहे.” कायलीच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असतानाच तिने ट्विट करून सर्वांनाच चकित केलं.

https://www.instagram.com/p/B2-ZmNFHjKk/

https://www.instagram.com/p/B27Hiq2nk5B/

https://www.instagram.com/p/B2W0S7anGVQ/

https://www.instagram.com/p/B1MNRdQnxKc/

https://www.instagram.com/p/B1Gw0o3HLpl/

https://www.instagram.com/p/B1G-0wYn3j7/

https://www.instagram.com/p/B0O0ssinHUZ/

https://www.instagram.com/p/B0Czep1HJUM/

https://www.instagram.com/p/B0CzsWcHDvB/

https://www.instagram.com/p/Bz_5AExndJi/

https://www.instagram.com/p/Bz8jXd7HqFV/

https://www.instagram.com/p/Bz6Mtb2nq2f/

Visit : Policenama.com