परदेशवारी महागली ! 75 % महागलं L-1 Visa चे अर्ज शुल्क, H1-B व्हिसासाठी सुद्धा 21 % ची वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – H1-B Visaच्या साठी बेसिक अ‍ॅप्लीकेशन फी आता 21 टक्के वाढवून 460 डॉलरवरून 555 डॉलर होईल. L-1 Visaची बेसिक फी सुद्धा 75 टक्के वाढवून 805 डॉलर होणार आहे. L-1 Visaचा वापर एखाद्या कर्मचार्‍याला इन्ट्रा-कंपनी ट्रान्सफरसाठी होतो. दोन्ही प्रकारच्या वीजाची ही अ‍ॅप्लीकेशन फी यावर्षी ऑक्टोबरपासून लागू होईल. कारण, वीजाचा खर्च मालकांकडून केला जातो, यामुळे आता या कंपन्यांना आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याला परदेशात पाठवणे पहिल्यापेक्षा महागडे ठरणार आहे.

H1-B अर्जदारांमध्ये सर्वात जास्त भारतीय
अलिकडच्या आकड्यांवरून समजते की, मागील आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 3.88 लाख H1-B Visa जारी करण्यात आले. यापैकी सुमारे 2.78 लाख वीजा म्हणजे 72 टक्के भारतीय लोकांनाच जारी झाले होते. यामध्ये वीजा एक्सटेन्शनचे सुद्धा आकडे सहभागी आहेत. एकीकडे जास्त संख्येत भारतीय लोकच H1-B Visa साठी अर्ज करतात. तर, अमेरिकेतील कंपन्यासुद्धा मोठ्या संख्येने H1-B Visa वर्कर्सला नोकरी देतात. सध्या, L-1 Visaचे आकडे जारी करण्यात आलेले नाहीत.

अमेरिकन इमिग्रेशन एजन्सीकडे फंडची कमतरता
सध्या, अमेरिकेची इमिग्रेशन एजन्सी, यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस अमेरिकी सरकारकडून 1.2 अरब डॉलरची इमर्जन्सी फंडिंगची मागणी करत आहे. या एजन्सीने आपल्या वर्कफोर्समध्ये 13,000 लोकांची कपात करण्याची योजना ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत टाळली आहे. साधारणपणे, या एजन्सीला फंडिंगचा एक मोठा भाग वीजासाठी अर्ज करण्यात येणार्‍या फी तून येतो.

वीजा एक्सटेन्शनवर सुद्धा वाढले पैसे
सध्या, ज्या कंपन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि त्यांचे 50 टक्के किंवा यापेक्षा जास्त कर्मचार्‍यांना H1-B Visa किंवा L-1 B Visa जारी केला आहे, अशा कंपन्यांना प्रति H1-B Visa 4,000 डॉलर आणि प्रति L-1B Visa 4,500 डॉलर भरावे लागतात. आता वीजा रिन्यू करणे म्हणजे याचा कालावधी वाढवण्यासाठी सुद्धा पैसे भरावे लागतील. अमेरिकन एजन्सीला यातून अतिरिक्त 20 कोटी डॉलर कमाई होईल.

या सर्व्हिसेसचे सुद्धा वाढले दर
H1-B Visa वीजाधारकाच्या पती/पत्नी ला आता वर्क परमिटसाठी 550 डॉलर भरावे लागतील. या फीमध्ये 34 टक्के वाढ केली आहे. सिटिझनशिपसाठी अर्ज करण्यासाठी फी 640 डॉलरवरून वाढवून 1,170 डॉलर झाली आहे. अशाप्रकारे यामध्ये 83 टक्के वाढ केली आहे. बायोमेट्रिकसह अन्य प्रकारच्या सर्व्हिसेससाठी सुद्धा फी मध्ये वाढ केली आहे.