L3 – Liquid Leisure Lounge Pune | हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्सचे सेवन?; पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात (Videos)

पुणे : L3 – Liquid Leisure Lounge Pune | पुण्यातील एफसी रस्त्यावरील (FC Road Pune) लिक्विड, लेजर, लाऊंज (L3 – Liquid Leisure Lounge) या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल घेत पुणे पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Drug Case)

ताब्यात घेतलेल्यांपैकी हॉटेलचा व्यवस्थापक, कर्मचारी आणि अन्य तिघांचा समावेश आहे. या पाच जणांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे. दरम्यान पार्टीसाठी ड्रग्स पुरवणाऱ्या ड्रग्स पेडलरची माहिती हॉटेल व्यवस्थापकाला असण्याची शक्यता आहे. (Pune Crime Branch)

त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून चौकशी केली जात आहे. याबाबत हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (Excise Department Pune) चरणसिंह राजपूतही (Charan Singh Rajput) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Nashik Highway Accident | ‘माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं’;
अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न (Video)