‘लाल कप्तान’चा ट्रेलर रिलीज ! सुरू झाला ‘नागा साधु’चा खूनी खेळ, अंगावर शहारे आणणारा ‘सैफ’चा लूक (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सैफ अली खानच्या लाल कप्तान या सिनेमाच्या ट्रेलरचा फर्स्ट पार्ट रिलीज झाला आहे. चॅप्टर वन- द हिंट असं नाव या फर्स्ट पार्टला देण्यात आलं आहे. या सिनेमात सैफच्या कॅरॅक्टरचं नाव नागा साधू आहे. ट्रेलरमध्ये सैफचा दमदार अपीरंस दिसत आहे. ट्रेलरमध्ये तो खूपच हिंसक दिसत आहे. क्लोजअप शॉट, कपाळावर लाल टीळा, डोळ्यात काजळ, चेहऱ्यावर लावलेला भस्म अशा लुकमध्ये सैफ खूपच अ‍ॅग्रेसिव्ह दिसत आहे. सैफ अली खान लोकांना मारताना आणि घोड्यावरून लोकांना फरपटत नेताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. या सिनेमात प्रतिशोधाचा प्रवास दाखवला जाणार आहे.

सोशल मीडियावर या ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे. सैफचा लुक आणि अ‍ॅक्टींग चाहत्यांना खूप आवडली आहे. ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हाचाही व्हाईस ओव्हर आहे. 18 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता परंतु नंतर ही डेट बदलण्यात आली. या सिनेमात सोनाक्षीचा गेस्ट अपीरंस दिसणार आहे. हा सिनेमा दीपक व्यंकटेश यांनी लिहीला आहे. आनंद एल राय ने या सिनेमाची निर्मिती केली आहे तर नवदीप सिंह यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लाल कप्तानसोबतच सैफ नितीन कक्कर यांच्या जवानी जानेमन या सिनेमात दिसणार आहे.

Visit : policenama.com