Laal Singh Chaddha Poster : आमिर खाननं ‘बेबो’ करीनाला दिल्या खास अंदाजात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर लाल सिंह चड्ढा या सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. वॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आमिर खाननं एक स्पेशल नोट लिहित लाल सिंह चड्ढामधील करीना कपूरचा लुक शेअर केला आहे. सिनेमातील आमिर खानचा लुक आधीच समोर आला होता. यानंतर आमिरनं आता करीनाचा लुक रिलीज केला आहे.

‘असा’ आहे करीनाचा लुक

आमिर खाननं सिनेमाचं पोस्टर शेअर करत करीनासाठी स्पेशल मेसेज लिहिला आहे. करीनाला वॅलेंटाईनच्या शुभेच्छा देताना आमिरनं लिहिलं आहे की, “मिळवण्याची अस्वस्थता आणि गमावण्याची भीती… फक्त एवढासाच आहे आयुष्याचा प्रवास. काश मी तुझ्या प्रत्येक सिनेमात रोमँस करू शकलो असतो. हे नॅचरली माझ्या आतून येतं.” करीना एकदम साध्या लुकमध्ये दिसत आहे. पंजाबी ड्रेस आणि कपाळाला टिकली असा तिचा लुक आहे. पिवळ्या रंगाचा हा ड्रेस करीनाला खूपच सूट करत आहे.

अद्वैत चंदननं डायरेक्ट केलेला लाल सिंह चड्ढा हा सिनेमा या क्रिसमसला रिलीज होणार आहे. हा सिनेमा फॉरेस्ट गंप या हॉलिवूड सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे. या सिनेमात टॉम हॅक्स प्रमुख भूमिकेत होता. फॉरेस्ट गंपप्रमाणेच हा सिनेमा परफेक्ट करण्यासाठी अनेक ओरिजिनल लोकेशन्सवर सिनेमाची शुटींग करण्यात आली आहे.

You might also like