खा. इम्तियाज जलील यांचा महिला पोलिसाच्या हातावर फटका, FIR दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात जमलेल्या गर्दीचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला इम्तियाज जलील यांनी फटका मारला होता.

कोण आहे 6 वर्षांची माहिरा इरफान, जिच्या आवाहनावर राज्यपालांनी कमी केली ऑनलाइन क्लासेची वेळ

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने एका दुकानावर कारवाई करण्यात आली होती. या दुकानचं सील काढण्यासाठी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) हे व्यापाऱ्यांबरोबर कामगार आयुक्तांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचं कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरु केले. चित्रीकरण सुरु असताना महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पाडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. कामगार कार्यालयात जमलेल्या गर्दीचं चित्रीकरण महिला पोलीस कर्मचारी करत असताना इम्तियाज जलील चांगलेच संतापले. मनोरंजनासाठी चित्रपट पाहायला आलेलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे रहा, अशा शब्दात जलील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावलं आणि कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारला. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह इतर 24 दुकानदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तियाज जलील आणि 24 व्यापाऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम 353,332,188,269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !