कामगार दिनानिमीत्त मजुरांना परिवर्तन सोशल फाऊंडेशन मार्फत हेल्मेटचे वाटप

पिंपरी चिंचवड: पोलीसनामा आॅनलाईन

पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी असून मोठ्या प्रमाणावर याठिकाणी कामगार वर्ग आहे.शहरामधील सुरक्षा अभावी कामगारांचे होणारे अपघात लक्षात घेता परिवर्तन सोशल फाऊंडेशन च्या वतीने तब्बल १५० हेल्मेट कामगारांना मोफत देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढ होत आहे.महाराष्ट्रासह देशातील नागरिक याठिकाणी पोटापाण्यासाठी येतात. त्याच बरोबर इमारतीचे प्रमाण देखील वाढत आहे आणि यातच कामगारांच्या प्रमाणात वाढ होत आहे.अश्या घटना रोखण्यासाठी परिवर्तन सोशल फाऊंडेशन थेरगाव येथील तरुणांनी कामगार दिनाचे औचित्य साधुन डांगे चौक येथिल मजुर नाक्यावर निराधार कामगारांना सुरक्षेचे धडे देत कामगारांना सेफ्टी हेल्मेट वाटप व सुरेक्षेबाबतीत मार्गदर्शन केले, परिवर्तन सोशल फाऊंडेशन तर्फे नेहमी या प्रकारचे सामाजिक व उल्लेखनिय उपक्रम केले जातात. या उपक्रमाचे नियोजन परिवर्तन सोशल फाऊंडेशनचे राहुल सरवदे, रोहित ढोबळे, राहुल जाधव, मयुर कांबळे, राम गवळी, दशरथ रणपिसे, तुषार कांबळे, प्रकाश गायकवाड, सचिन क्षिरसागर, अंतोष शिंदे यांनी केले.या कार्यक्रमासाठी वाकड पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक महेश स्वामी साहेब व अखिल गणेशनगर युवा प्रतिष्ठानचे अनिकेत प्रभु, श्रीकांत धावारे,प्रशांत चव्हाण हे उपस्थित होते.